top of page
    प्रस्तावना

निसर्गरम्यतेने आणि चालीरीती, संस्कृतीने भरलेले भादवे गाव !

सफाळे (प.) विभागात येणारे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस १४ कि. मी. अंतरावरील , निसर्गाच्या हिरवळी काळजाच्या कप्प्यात वसलेले आणि अनेक वर्षांची अनेक क्षेत्रांतील कारकीर्द परंपरा लाभलेले भादवे गाव ,,एका बाजूस अरबी समुद्र , दुसऱ्या बाजूस दूरवर पसरलेल्या परंतु नजरेस दिसणाऱ्या  डोंगर रांगा .बोलीभाषेचा एक वेगळाच शब्दबंध आणि गावाची माती आजही मुंबई उपनगरात आणि देशात परदेशात वसलेल्या ह्या ग्रामवासियांना गावात खेचून आणते......................|
भादवे हे नाव - पूर्वी तांदळाची गावामध्ये लागवड भरपूर प्रमाणात होत असे आणि उत्पादन हि प्रचंड प्रमाणात होई ...भरपूर वर्षापूर्वी तांदूळ देऊनच  देवाण-घेवाण होत असे .. तांदळास ( भात ) म्हणून संबोधले जाते ..त्यामुळे भादवे हे नाव ह्या गावास पडले आहे असे दिसून येते ..
गावामध्ये लोभक-पुरातनीय शंकर-मंदिर , भवानीदेवी मंदिर , हनुमंत मंदिर आहेत ; तसेच ग्रामदेवता मडोबा ,वाकडा आंबा ,शेड्या, डोखरोबा इतर ... अशा प्रकारची गावातील लोकांच्या श्रद्धांची ठिकाणे आहेत .. गावाच्या रानातील जांभूळ ,राजने,बोखर,उंडे ,धामणे  असा रानफळांचा रानमेवा भरपूर उपलब्ध आहे ..
 ३ किलोमीटरवरील समुद्र आणि गावाला लागून असलेला खाडीचा समतल भाग (खाजन) तसेच गावात पाळीव कोंबड्या आणि बकऱ्या त्यामुळे मासे आणि मांस ह्यांची उत्तम उपलब्धतता आहे ..गावामध्ये दुग्ध व्यवसाय , भाजीपाला लागवड  व्यवसाय  हे व्यवसाय ही आहेत .
गावामध्ये दिवाळी , होळी ,संक्रांत , गणपती-गौरी , दसरा मोठ्या उत्साहात आणि चालीरीती सोबत साजरा केला जातो .
त्याचप्रमाणे दसऱ्याच्या वेळेस साजरा होणारा गवाळी  ( गावाच्या चहुबाजूनी तांदळाच्या भाताच्या कुर्मुरी (लाया-भुर्गुल्या) उडवीत गावाचे देवी रक्षण करते अशा प्रकारचा एक मनामध्ये भाव घेऊन हा उत्सव साजरा केला जातो)  सारखा एक गावाचा प्रभावी सण तितकाच उत्साहात साजरा केला जातो .
गावातील भूभागांची नावें  वैशिष्टपूर्ण  आहेत ( शिवार-शिरवंद , उक, मान्ट, दरकुंड, वावे , ढोबाळ ,बदाड,खारवळ इ.)
बैलगाड्यांच्या गुंगरांची चाहूल आणि गुरांच्या पावलांची पाऊल , छातीच्या ठोक्यांची काहूर लाऊन आजही लोकांची नजर उडवून जाते ........
 गावामध्ये भादवे-मधुकरनगर ग्रुप ग्रामपंचायत आहे . आपल्या कष्टाळू पणाची साक्ष देणारे स्त्रीशक्ती महिला बचत गट कार्यरत आहेत.

 शब्दांच्या मागे येणारा आपुलकीचा आवाज ...
   हृदयाच्या तारेवर गावाचे नाव छेडून जातो ...
 फुलांच्या पाकळ्यात दवबिंदू घेऊन ...
   आठवणींच्या संगीताने गावाचे गीत गात राहतो ...

                 सूचना

►शताब्दी वर्ष २०१८ 
आमची शाळा  जिल्हा परिषद शाळा भादवे
स्थापना - १७ एप्रिल १९१८
शताब्दी महोत्सव मे - २०१८ मध्ये साजरे कारण्याबाबत आवाहन
संपर्क - ८३५६०३९५८०  

► भादवे गावातील सर्व १० वी आणि १२ वी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन 

   घडामोडी

 

* दर वर्षी प्रमाणे वैशाख पंचमीस ७/४/२०१७ रोजी भवानी देवीची यात्रा ग्रामवासियांच्या स्नेहभावाने साजरी करण्यात आली 

* दि  १/४/२०१७ दिनी भादवे गाव वाचनालय आणि अभ्यासीका आयोजित आणि स्व . लक्ष्मणरावशास्त्री चिकटगावकर फाउंडेशन प्रस्तुत " जागर लोककलेचा ' कार्यक्रम संपन्न  झाला 

महाराष्ट्र टाइम्स -http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/saphale-folk-art-program-in-bhadave/articleshow/57995828.cms?utm_source=whatsapp

* भादवे गावातील परंपारंगत संस्कृती आणि गाणी बनविण्यास प्रयत्न चालू आहेत तर त्याविषयी bhadavegaon@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा  

- Bhadavesong

bottom of page