top of page

नमस्कार मित्रहो ...        गाव.. असे  नाव कि जे दोन अक्षरी आहे अगदी आई सारखे ..पदराखाली आल्यासारख वाटते ...  गाव हि संकल्पना आज नष्ट होत चालली आहे त्यातील चालीरीती , परंपरा ह्या सर्व भारतीय संस्कृतीशी निगडीत संकल्पना आपला आकार परंपरागत न राहता विकासात्मक आणि नाविन्य पूर्ण बनवीत असताना जे आपल्या पूर्वज्यांनी आपल्या ओंझळीत टाकले असे संस्कृतीचे फळ अथवा शिदोरी आज कुठे हरवत चालली आहे . संगणकीय आणि बहुउद्देशीय भ्रमणध्वनी आणि  जलद आंतरजाल पाहता गुंतलेली तरुणपिढी त्याच गुंत्यातून एखादे सुंदर तोरण वीणेल एवढी माफक अपेक्षा ....        आज येणारी नवनवीन संपर्काची माध्यमे लक्षात घेत .हे एकसंघ app बनविले आहे ..तुम्हाला माहित असलेल्या अनेक गोष्टी तुम्ही ह्यावरील लिंक भादवे गाव facebook अथवा विविध उपक्रम भादवे गाव whatsApp , नवीन माहिती bhadavegaon@gmail.com  ह्यावर पाठवू शकता.     जेणेकरून ती माहिती जागतिक महाकोश wikkipedia टाकता येऊ शकेल.जे उपक्रम आपण मिळून साधू त्याचा काही भाग जरी उपयोग होवू शकला तरी पुरे ....माणूस म्हणून जगताना आपण अनेक गोष्टी विचारात घेतो पण उद्या आपल्या मुलाला "आठ  जण   गडी माझ्या सोळा टीपऱ्यारे" किवा  " तिळा तंदुला ..." अशा ओळी कानावर पडता केविलवाण्या नजरेने संशोधनाची पुस्तके चालण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही....आपण सुधारलो असा इंग्लिश माध्यमाचा आव आणून एक भाग रिकामा राहतो जगण्यात कुठेतरी....हे आपण विसरतो गाठ बांधत मनाशीतर मित्रानो फक्त संस्कृती नाही तर विविध उपक्रम साधण्याचा हा प्रयत्न संपर्कासाठी विविध सोयी ह्या दुव्याच्या शेवटच्या टप्प्यात  ( संपर्क - contact ) मध्ये दिल्या गेल्या आहेतत्याचा उपयोग करून नक्कीच तुम्ही सहकार्य कराल...धन्यवाद ......आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ..आपला कृपाभिलाषी ...

 about 

मी हि आता रस्ता शोधतोय
मोजत चौकोन रुंद  सारीपटावर ...
पिंजून काढला गाव सारा
गावाची आठवण घेऊन बंद ओठांवर...

शिवार ते शिर्वंद... बदाड ते दर्कुंद...

     

       क्षणचित्रे

bottom of page